मराठवाडा साहित्य संमेलनाचे शनिवारी उद्घाटन : दोन दिवस होणार विविध विषयावर विचारमंथन

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषद आणि विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे दगडोजीराव देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

15 व 16 फेब्रुवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध विषयावर विचारमंथन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयडीसी वाळूज परिसरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनासाठी विलासराव देशमुख साहित्यनगरी उभारण्यात येत आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारपीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठ या दोन स्वतंत्र व्यासपीठावर विविध परिसंवाद होणार असल्याचे कौतिकराव ठाले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भीमरव वाघचौरे, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, माजीमंत्री आ. अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कौतिकराव ठाले यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय राऊत, डॉ. गणेश मोहिते, स्वागत मंडळाचे विवेक जयस्वाल, दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल हजारे, उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर, मनीष जैस्वाल, रमेश कोनडलकर, डॉ. युवराज धबडगे, प्रा. नागेश बोंतेवाड आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »