Stone pelting on a vehicle : समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या वाहनावर दगडफेक

Stone pelting on a vehicle

Stone pelting on a vehicle : समृद्धी महामार्गावर अनेक अपघात घडले. लुटमारी, डीझेल चोरी, दरोडा अशा अनेक घटनांमुळे प्रवाशांसाठी असमृद्ध बनलेल्या समृद्धी महार्मागावर पुन्हा एक भयंकर घटना घडली आहे. 8 ऑक्टोबरच्या उत्तररात्री एका खाजगी वाहनावर अज्ञात टवाळखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

Stone pelting on a vehicle

बीबी : राज्य सरकारसाठी महत्वकांशी ठरलेला ‘समृद्धी महामार्ग’ अनेकदा विविध घटनांनी चर्चेत आला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेला ‘महाअपघात’ आजही न विसरता येणारा आहे. त्यामध्ये तब्बल २५ निष्पाप जीवांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर देखील समृद्धी महामार्गावर अनेक अपघात घडले. लुटमारी, डीझेल चोरी, दरोडा अशा अनेक घटनांमुळे प्रवाशांसाठी असमृद्ध बनलेल्या समृद्धी महार्मागावर पुन्हा एक भयंकर घटना घडली आहे. 8 ऑक्टोबरच्या उत्तररात्री एका खाजगी वाहनावर अज्ञात टवाळखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

Stone pelting on a vehicle

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीबी पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावरील (चॅनल क्रमांक ३०७) देऊळगाव कोळी ते बीबी मार्गावरून एम.एच २९ बीई. क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स रात्रीच्या सुमारास जात होती. दरम्यान, काही अज्ञात इसमांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक केली. यामध्ये काचा फुटून दगड आत आल्याने चालक रुपेश माधव (रा. मांडवा ता. डिग्रस) यांना जबर मार लागला. तसेच प्रवासी राजेंद्र राठोड, अनिल गवई (दोघेही रा. जि.यवतमाळ) यांनाही दगडाचा मार लागल्याने किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबतची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच उपनिरीक्षक जितेंद्र राऊत, हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, प्रवीण पोळ, श्रावण घट्टे ,नागरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. जखमींवर समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहीकेचे डॉक्टर वैभव बोराडे यांनी उपचार केले. दरम्यान, बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अमलदार अरुण सानप ,चव्हाण, भगवान नागरे यांनी घटनास्थळ परिसरात अज्ञात इसमाचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. ट्रॅव्हलचालक रुपेश यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रॅव्हल सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली होती. त्यामुळे मोठी हानी टळली. नियंत्रण सुटले असते मोठ्या अपघाताची शक्यता होती. पोलिसांची नजर चुकवून अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यांचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »