827 acres of land approved for Toyota Kirloskar : शेंद्रा – बिडकीन एमआयडीसीत टोयाटो किर्लोस्कर उद्याेगाला ८२७ एकर जमीन मंजूर!

827 acres of land approved for Toyota Kirloskar

827 acres of land approved for Toyota Kirloskar : टॉयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीला सोमवारी दि. ७ छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जमीन मंजूर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

827 acres of land approved for Toyota Kirloskar

छत्रपती संभाजीनगर : टॉयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीला सोमवारी दि. ७ छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जमीन मंजूर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडच्या (MITL) अंतर्गत विकसित होत असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन या स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी प्रकल्पात ही जमीन देण्यात आली आहे.

टीकेएमने ३१ जुलै रोजी राज्य सरकारसोबत करार केला होता. या करारानुसार कंपनी विद्युत आणि हायब्रिड वाहनांसाठी ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारणार आहे. या प्रकल्पात २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, जानेवारी २०२६ पर्यंत उत्पादन सुरू होईल. यामुळे ८ हजार थेट आणि १८ हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराराच्या वेळी या प्रकल्पामुळे दरवर्षी ४ लाख विद्युत आणि हायब्रिड कारचे उत्पादन होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील वाहन उद्योगात क्रांती घडणार आहे. याचबरोबर रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »