जालना : पारध ( ता. भोकरदन, जि. जालना ) येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार गंगाधर लक्ष्मण अंबेकर यांचे सोमवार, 14 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 77 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जालना येथील रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर सोमवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गंगाधर अंबेकर यांनी तब्बल चाळीस ते पंचेचाळीस वर्षे त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेची सेवा दिली. ग्रामीण भागातील प्रश्न त्यांनी सातत्याने वृत्तपत्रातून प्रभावीपणे मांडले. याशिवाय ते उत्तम कवि, शाहीर, लोककलावंत, नाट्यकर्मी देखील होते. भजनातील गण, गवळण, भारूड, लावणी, पोवाडा आदी साहित्य लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘लावणीचे लावण्य’, ‘हिराजी बाबांचा पोवाडा’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.