dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राख नदीमध्ये न विसर्जित करता वृक्ष लागवडीचा वरठाण ग्रामपंचायतीचा संकल्प 

वरठाण :  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करुन ती वृक्ष जगविणे आता काळजी गरज आहे त्याकरीता वरठाण गावातील व्यक्ती मृत झाल्यास राख सारवण करुन ती नदी कींवा तलावामध्ये न टाकता गायरान जमिनीत किंवा शेतात टाकून त्या ठिकाणी दोन वृक्ष लागवड करुन त्याच ठिकाणी राख विसर्जित करण्याचा संकल्प वरठाण ग्रामपंचायतने घेतला आहे ह्या संकल्पाचे गावात कौतुक करण्यात येत आहे.

वरठाण येथील सुभाष रतनसिंग सोळंके यांचे शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांचा राख सारवणचा कार्यक्रम रविवार, 28 डिसेंबर रोजी झाल्यानंतर ती राख नदीमध्ये न टाकता स्मशानभूमीच्या परिसरात दोन खड्डे खोदून त्यामध्ये वडाचे झाडे लाऊन संकल्पास सुरवात करण्यात आली.

तसेच यापुढे लागवडीसाठी झाडे ग्रामपंचायतच्या वतीने दिली जाणार असून लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार असल्याचे सरपंच अनिल सोळंके यांनी सांगितले. यावेळी सरपंच अनिल सोळंके, उपसरपंच धरमसिंग सोळंके, पोलीस पाटील नरेंद्र सोळंके, डॉ भाऊसाहेब सोळंके, डॉ सचिन सोळंके, डॉ मनोज सोळंके, नरसिंग सोळंके, रावसाहेब सोळंके महेद्र पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top