dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परभणी मनपा निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पत्रकार परिषदेत युतीची घोषणा

परभणी :  आगामी परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटात युती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सोमवार, 29 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार राजेश विटेकर, शहराध्यक्ष प्रताप देशमुख, रोहन सामाले आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची युती ही नैसर्गिक आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जागा वाटपाची सूत्र निश्चित करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top