अंबड : कौटुंबिक वादातून पुतण्याने सख्या चुलत्याचा निर्घृण खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील पंगारखेडा येथे शनिवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दिगंबर श्रीरंग लांडे (वय अंदाजे ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली आहे.

अंबड पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, कोरोना काळांत शेतीच्या वादातून कौटुबिंक वाद निर्माण झाला. याप्रकरणी पोलीसात केस दाखल करण्यात आली होती. याचा मनात राग धरल्याने ही हिंसक घटना घडली. शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुतण्या आणि भावाने मिळून त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. बेदम मारहाणीमुळे दिगंबर लांडे बेशुद्ध झाले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून खासगी रुग्णालयात हलवूनही त्यांचा जीव वाचवता आला नाही.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला.तसेंच चार संशयित आरोपीना अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश आहे. उर्वरित आरोपीं विरुद्ध शोधमोहीम आहे. या दुर्दैवी घटनेने पांगरखेडा गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.