अंबड : ऊस बिलातून टना मागे १५ रुपये कपातीच्या मंत्री समितीच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. रविवार, 5 ऑक्टोबर रोजी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वडीगोद्री येथे या निर्णयाची होळी कण्यात आली.

राज्य सरकार आता पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली दलाली करू लागले आहे. सरकारने दलाली खाणे बंद करावे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करावा. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पहिले प्रतिटन ५ रुपयांवरून आता १५ रुपये दर निश्चित केला आहे. यातील ५ रुपये हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले जाणार तर उर्वरित १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा होणार आहे. हे १० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर दरोडा घालण्याचा प्रकार असून संपूर्ण १५ रुपये पूरग्रस्तांना देण्याचा शासनाचा निर्णय असता, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य केले असते. मात्र ५ रुपये पुरग्रस्तांना आणि १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत ठेवण्यात येणार असल्याने या निर्णयाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर विरोध करण्यात येत असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिली. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, विजय लहाने, गणेश कव्हळे, विठ्ठल बांड, राजू राठोड, अमरसिंग राजपूत, नामदेव भोले आदींची उपस्थिती होती.