अकोला : एसटी आरक्षणासाठी राज्यभरातील बंजारा समाज आक्रमक झाला आहे. त्याची धक अकोल्यातही सोमवारी बघायला मिळाली. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा, ही संविधानिक मागणी घेऊन शेकडो बंजारा समाज बांधवांचा मोर्चा सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

अकोला : एसटी आरक्षणासाठी राज्यभरातील बंजारा समाज आक्रमक झाला आहे. त्याची धक अकोल्यातही सोमवारी बघायला मिळाली. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा, ही संविधानिक मागणी घेऊन शेकडो बंजारा समाज बांधवांचा मोर्चा सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चाची सुरुवात सकाळी ११.३० वाजता अग्रसेन चौक येथून झाली. जिल्हा क्रीडा संकुल येथील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा बसस्थानक, गांधी रोड, महानगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी प्रा. विजय चव्हाण यांनी बंजारा समाजबांधवांना संबोधित केले. केंद्र सरकारने बंजारा समाजावरील हा आरक्षणातील भेदभाव दूर करून अनुस्चित जमाती (एसटी) या एकाच प्रवर्गात समाविष्ट करावा, अशी मागणी यावेळी बंजारा समाजातर्फे करण्यात आली. ही मागणी संविधानिक, मूलभूत असल्याचे आंदोलकांनी यावेळी म्हटले. बंजारा समाजाने प्राचीन काळापासून भारतीय समाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तांडा पद्धतीद्वारे वाहतूक व दळणवळण सांभाळणे हे त्यांचे प्रमुख कार्य होते; परंतु इंग्रजांच्या राज्यकाळात त्यांच्या जीवनपद्धतीवर निर्णायक आघात झाला. १८५३ मध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तांडा व लदेणी व्यवस्था विस्कळीत झाली. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये मुक्तता जाहीर झाली. मात्र आधीच तयार झालेल्या अनुसूचित जाती-जमातींच्या अनुसूचितून वगळल्यामुळे बंजारा समाजाला त्याचा लाभ मिळाला नसल्याची खंत यावेळी आंदोलकांतर्फे व्यक्त करण्यात आली. मोर्चात इंजिनिअर अमर राठोड, डॉ. प्रकाशसिंग राठोड, प्रा. एन. एम. चव्हाण, यशपाल जाधव, प्रा. डी. एस. राठोड, कुणाल जाधव, प्रा. विजय चव्हाण, प्रा. भीमसेन राठोड, प्रा. सतीश जाधव, प्रा. महेश राठोड, लता राठोड, अश्विनी जाधव, कुलदीप चव्हाण, आशिष राठोड, किशोर राठोड आदींसह शेकडो बंजारा समाजबांधवांचा सहभाग होता.
