निवडणूक कार्यकर्त्यांची, कसोटी नेत्यांची! कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याचे आव्हान

अभिषेक वरपे / बुलढाणा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल दीर्घ प्रतिक्षेनंतर  वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी राजकीय अभिनेवेश ठेवून दल बदलेल्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याचे आव्हान जिल्ह्यातील नेत्यांपूढे निर्माण झाले आहे. यामुळे, निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी कसोटी नेत्यांचीच लागणार!असे म्हणावे लागत आहे.  

    चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रशासकीय पातळीवर देखील  अनुषंगिक हालचाली वाढल्या  आहेत.  राज्य निवडणूक आयोगाने तालुकानिहाय लोकसंख्येची माहिती मागवली आहे. यामुळे दिवसेंदिवस उभेच्छुकांची उत्सुकता तीव्र होत आहे. अशातच, काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. दहा, वीस वर्षांपासून एका पक्षात सक्रिय असणारे अनेक कार्यकर्ते  दुसऱ्या प्रस्थापित पक्षाचे जड पारडे लक्षात घेता सामील झाले आहेत. बुलढाणा जिल्हयाविषयी बोलायचे झाल्यास, लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.  त्यामुळे अनेकांनी महायुतीची  गाडी पकडून सत्तेच्या मार्गाने प्रवास करण्याचे ठरविले, असे दिसून येते. 

स्वबळाची उभाळी येणार आडवी! 

स्थानिक निवडणुकांना महायुती एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, युतीतील अंतर्गत धुसफूस नेहमीच चव्हाट्यावर  आली आहे. शहरी व ग्रामीण भागात याचे पडसाद अधिक उमटले आहेत. यामुळे, कार्यकर्त्यांना संधी देण्यात युतीत स्वबळाची उभाळी आडवी येणार असे संकेत दिसून येतात.  

दृष्टिक्षेपात लढती

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुका एकाच वेळी होतील की दोन टप्प्यात?  असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.  दोन टप्प्यात झाल्यास 11 पालिकाच्या निवडणुका अगोदर  होणार हे नक्की. जिल्ह्यातील संग्रामपूर आणि मोताळा नगर पंचायत मध्येच सध्या ‘लोकशाही’ असून लोकांनी निवडलेले अध्यक्ष आणि सदस्य आहेत. उर्वरित बुलढाणा, चिखली, शेगाव, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव  , लोणार, सिंदखेड राजा आणि नांदुरामध्ये प्रशासक राज आहे. या ठिकाणी निवडणुका होणार आहे. तसेच 60 सदस्य संख्या असलेली जिल्हा परिषद आणि 120 सदस्य संख्या असलेल्या 13 पंचायत समित्याच्या निवडणूका  रंगणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »