छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद हॅजेट लगू करण्यात येत असल्याचा शासन निर्णय काढला. मात्र या निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू होणार नाही. जे पूवचे कुणबी आहेत त्यांनाच ते मिळणार आहे. त्यामुळे वंशावळ सिध्द न होणाऱ्या मराठ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे मत मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे, डॉ. शिवानंद भानुसे यांनी येथे व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद हॅजेट लगू करण्यात येत असल्याचा शासन निर्णय काढला. मात्र या निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू होणार नाही. जे पूवचे कुणबी आहेत त्यांनाच ते मिळणार आहे. त्यामुळे वंशावळ सिध्द न होणाऱ्या मराठ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे मत मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे, डॉ. शिवानंद भानुसे यांनी येथे व्यक्त केले.
2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतर मराठ्यांना काय मिळाले? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी राज्यातील मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांची 18 सप्टेंबर रोजी शहरातील राणाजी मंगल कार्यालय येथे सकाळी 11 ते 4 या वेळेत मराठा आरक्षण सिंहावलोकन राज्यस्तरीय गोलमेज परिषद होणार आहे. या परिषदेची माहिती देण्यासाठी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. लाखे आणि डॉ. भानुसे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले मराठा समाजाला सरकारने फसवले आहे. त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काम केले आसून त्यांनी मराठ्यांचे आंदोलन बुडविण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले, 1967 च्या कायद्यानुसार कुणबी जात 83 व्या क्रमांकावर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी आपली जात कुणबी असल्याचे सिध्द करावे लागणार आहे. मात्र त्यासाठी वंशावळ जुळणे आवश्यक आहे. मराठवाड्यात या नोंदीनुसार प्रमाणपत्रे दिली जात नव्हती 7 सप्टेंबर 2023 रोजी नियुक्त केलेल्या माजी न्यायमुत शिंदे यांच्या निजामकालीन दस्तावेजाच्या अभ्यासानंतर नोंदींची दळल घेवून ती देण्यास सुरूवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यात पहिल्यांदा कुणबी समाजाला जात प्रमाणपत्रे मिळाली. जे लोक 58 लाख नोंदी सापडल्या असा दावा करीत आहेत तो खोटा असून 1967 पासून च्या त्या एकूण नोंदी असल्याचा दावा डॉ. लाखे यांनी केला.
मराठा समाजाची फसवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण दिले पण ओबीसींचे नुकसान होणार नाही असे सांगत आहेत. तर मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळाल्याचा दावा करीत आहेत. दोन्ही बाजूंकडून खोटे बोलले जात असून यात फक्त मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाज तीन आरक्षणाचा लाभ घेत असल्याचा दावा करीत आहेत. त्यांनी खुली चर्चा करून ते सिध्द करावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याचे सांगणाऱ्या मंत्री विखे यांच्यावरही त्यांनी टिकास्त्र सोडले.
यांची असणार उपस्थिती
ममाजी न्यायमुत कोळसे पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र कोंढरे, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विनोद पाटील, संजय लाखे पाटील, डॉ. शिवानंद भानुसे, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, उध्दव काकडे यांच्यासह 100 ते 150 अभ्यासक या राज्यस्तरीय गोलमेज परिषदेला असणार असल्याची माहिती संयोजक डॉ. भानुसे यांनी दिली.
