Jarange Patil’s condition deteriorated : उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Jarange Patil's condition deteriorated

Jarange Patil’s condition deteriorated : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज मंगळवार 11 जून रोजी प्रकृती खालावली. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Jarange Patil's condition deteriorated
Jarange Patil’s condition deteriorated

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज मंगळवार 11 जून रोजी प्रकृती खालावली. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. 8 जूनपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कठोर उपोषण सुरू आहे. उगाचच मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील गोड बोलून काटा काढायचे काम सुरू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचे इकडे कठोर उपोषण सुरू आहे. सरकार मुद्दाम बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे. त्यांना माया असती तर दखल घेतली असती. सरकारकडून खेळवणे सुरू आहे, असे दिसते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले आहे. परंतु मी उपचार घेणार नाही. माझी भूमिका कायम आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपचारास नकार दिला. यावेळी बोलताना त्यांनी तू थोडे थांब तुला कळेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनाही थेट इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »