dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दिल्ली गेट ते  हर्सूल टी पॉइंट रस्त्यावर  अतिक्रमण हटाव मोहीम सुरू 

छत्रपती संभाजीनगर :  दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावरील 30 मीटर रुंदीच्या सर्विस रोड साठी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, ७ जुलै पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.  या मोहिमेअंतर्गत जवळपास पाचशे मालमत्तांची पाडापाडी केली जाणार असल्याची माहिती मनपा अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी संतोष वाहूळे यांनी दिली.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागातील प्रमुख रस्त्यावर असलेल्या सर्विस रोडवर झालेली अतिक्रमण हटविण्याची मोहीम सध्या राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत महापालिकेने जालना रोडवरील केंब्रिज चौक ते चिकलठाणा, चिकलठाणा ते एपीआय कॉर्नर, पैठण रोडवरील महानुभव आश्रम चौक ते नक्षत्रवाडी, नक्षत्र वाडी ते रेल्वे स्टेशन उड्डाणपुल, पडेगाव ते मिटमिटा, शरणापुर फाटा ते पडेगाव या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीन दोस्त केली आहेत. 

 महानगरपालिकेने मार्किंग केल्यानंतर सोमवार , ७ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले असल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top