आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जालना : भरधाव आयशर ट्रकने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवार,10 जून रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान नाव्हा – जालना रोडवर घडली. शिवा पिंन्टु गायकवाड ( 25, रा. नाव्हा ता.जि.जालना ) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.     

   या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशर (   एम एच 20, डी ई 8477 ) ने पाठीमागून धडक दिल्यानंतर आयशर चालक न थांबता आयशर घेऊन सुसाट पळाला. मात्र सजग नागरिकांनी त्याचा पाठलाग करून तसेच समोरच्या गावातील लोकांना याची माहिती देऊन माळसावरगाव गावाजवळ आयशरला पकडले. तालुका पोलिसांनी आयशर ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.  दरम्यान, या घटनेनंतर गायकवाड याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शव विच्छेदनानंतर तरूणाचा मृतदेह नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »