dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विजेचा शॉक लागून वडिलांसह मुलामुलीचा मृत्यू; जालना तालुक्यातील वरुड नाव्हा गावातील घटना

जालना  : शेतातील उघड्या वायरचा शॉक लागून वडिलांसह मुलामुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वरुड नाव्हा येथे मंगळवार, 10 जून रोजी घडली.  

जालना  : शेतातील उघड्या वायरचा शॉक लागून वडिलांसह मुलामुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वरुड नाव्हा येथे मंगळवार, 10 जून रोजी घडली.  

    वरुड नाव्हा येथील विनोद म्हस्के ( 32 )  हे मंगळवारी शेतात मल्चिंग पांगवत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी श्रद्धा ( 10 ), मुलगा समर्थ  ( 7 ) हे दोन्ही बहीण भाऊ बाजूला खेळत होते.  यावेळी विनोद यांना शेतातील एका उघड्या वायरचा शॉक लागला. यावेळी त्यांच्या बाजूला खेळत असलेले श्रद्धा आणि समर्थ त्यांना पिण्यासाठी पाणी घेऊन आलेले असताना त्यांनाही शॉक लागला आणि दोन्हीही लहान मुले वडिलांच्या अंगावर कोसळले. या घटनेनंतर या तिघांनाही जालन्यातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका जालना पोलीस करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top