कुख्यात घरफोड्या करणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात; ९ तोळ्याची सोन्याची लग्गड पोलिसांनी केली जप्त

छत्रपती संभाजीनगर :  चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनीक्स सोसायटी येथे घरफोडी करुन तब्बल 5 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या कुख्यात चोरट्यास आणि चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सोनारांना गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले. सोनारांच्या ताब्यातून पोलिसांनी 9 तोळे वजनाची सोन्याची लग्गड जप्त केली असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मिस्त्री राजधर (38 वर्ष), रा. पो. बोदरी, ता.केरावत, जि.जैनपूर, उत्तरप्रदेश असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कुख्यात चोरट्याचे नाव आहे. तर रौनक योगेश सिंगवी (28 वर्ष), ललीत बाबूलाल सिंगवी (51 वर्ष), दोघे रा. साकीनाका, मुंबई अशी चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनारांची नावे आहेत. चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनीक्स सोसायटी येथे राहणाऱ्या आकाश राजेंद्र देवूळगावकर यांच्या घरी 20 जून रोजी चोरट्यांनी चोरी करुन 5 लाख 43 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, चिकलठाणा परिसरातील प्राईड फिनीक्स सोसायटी येथे चोरी करणारा अनिल राजधर हा सोलापुरच्या कारागृहात असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलिस अंमलदार सुनील जाधव, नवनाथ खांडेकर, सोमनाथ भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके आदींच्या पथकाने सोलापूर कारागृहातून अनिल राजधर याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने आकश देवूळगावकर यांच्या घरी चोरी केल्याची कबूली दिली. तसेच चोरी केलेले दागिने साकीनाका येथील रौनक सिंगवी व ललीत सिंघवी या सोनारांना विक्री केली असल्याची कबूली दिली. पोलिसांनी साकीनाका येथून रौनक सिंगवी, ललीत सिंगवी यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून 9 तोळे वजनाची सोन्याची लग्गड जप्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »