मानोरा : तालुक्यातील विठोली येथील अत्यल्पभूधारक शेतकरी गजानन महादेव टाले (वय ३८) यांचा मृतदेह शोधमोहीमेनंतर अखेर तिसऱ्या दिवशी नाल्यातील खोलगट डोहात आढळून आला. ७ सप्टेंबर रोजी ते नदीकाठच्या शेतात गेले होते. मात्र घरी परत न आल्याने नातेवाईक व गावातील युवकांनी शोधमोहीम सुरू केली होती. अखेर ९ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या शोधमोहीमेत जवळपास २० ते २५ युवकांनी सलग दोन दिवस पाण्यात उतरून शोध घेतला. अखेर तिसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता मृतकाचा भाऊ अनिल टाले यांना गट क्रमांक ३८४ व ३३८ मधील नाल्यातील खोलगट डोहात गजानन टाले यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
घटनेची माहिती पोलीस पाटील व तलाठी यांना दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे. मृतक टाले यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाल्याने शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.