छत्रपती संभाजीनगर : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात असल्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगरमधील ९ जणांना चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. गुरुवार,९ जुलै रोजी मध्यरात्रीपासून राज्यभरात दीडशे ठिकाणी ही छापेमारी सुरू असून, त्यात मराठवाड्यातील १३ ठिकाणांचा समावेश आहे.

पाकिस्तानी गॅगस्टरच्या संपर्कात असल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगर : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात असल्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगरमधील ९ जणांना चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. गुरुवार,९ जुलै रोजी मध्यरात्रीपासून राज्यभरात दीडशे ठिकाणी ही छापेमारी सुरू असून, त्यात मराठवाड्यातील १३ ठिकाणांचा समावेश आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये ९, जालन्यातून २, धाराशिवमधून १ आणि बीडमधून १ अशा एकूण १३ जणांना महाराष्ट्र ‘एटीएस’ने ताब्यात घेतले असून, त्यांना अज्ञातस्थळी चौकशीसाठी नेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मिसारवाडीत कारवाई केल्याचे सांगण्यात येते. मिसारवाडीतून ज्या संशयिताला ताब्यात घेतले, त्याची कार काही दिवसांपूर्वी थेट राजस्थान येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गेली होती. हा रस्ते प्रवास सुरक्षा यंत्रणांना अत्यंत संशयास्पद वाटल्याने त्याची कसून चौकशी सुरू आहे. सध्या शहजाद भट्टी हा दुबईत बसून गुन्हेगारी टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवतो. तो डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय तरुणांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत असून, या तरुणांमध्ये धार्मिकता कट्टरता भिनवत आहे. यातून त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळविण्याचा मोठा कट त्याने रचल्याची शक्यता आहे. देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला तो पुरवत असल्याचे समोर आल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या लक्ष्यावर तो आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जण तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट त्याच्या लाहोर येथील. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट त्याच्या लाहोर येथील हस्तकांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.


