जालना : हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जालना शहरात गुरुवार, 19 जून रोजी दुपारी 12 वाजता बसस्टँड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने काढलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या जीआरवर काळ्या रंगाची शाई टाकून या जीआरची होळी केली. राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

यावेळी मनसे कार्यकर्त्यानी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. हिंदी भाषा सक्तीची करून राज्य सरकार मराठी भाषेचे महत्व कमी करत असल्याचा आरोप मनसेने केला. यापुढे राज्य सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू, असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत म्हणाले की, यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यास कडाडून विरोध केल्याने शासनाने काढता पाय घेतला. परंतु आता पुन्हा महाराष्ट्र सरकार हिंदी भाषा राज्यावर लादण्याचे प्रयत्न करत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली असून हिंदी भाषा कदापिही लादून घेणार नाही, असा कडक इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांनी यावेळी दिला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगदरे, शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, महेश नागवे, विलास तिकांडे, गणेश देवडे, योगेश कदम, वैभव साळे, विवेक वैद्य, गोरगआप्पा पुंगुडवाल, चक्रधर दंडाईत, बाळासाहेब काळे, यश गिरी, दीपक गिरी, भागवत निकम, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने ऊपस्थिती होती.