MLA Gaikwad : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वाद पेटला असून, पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवीगाळ करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मंगळवार २८ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलढाणा : दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वाद पेटला असून, पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवीगाळ करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मंगळवार २८ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या उपस्थितीत बुलढाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये, ‘शिवाजी कोण होता’? या पुस्तकाचे वाचन केल्या जाणार आहे. तर दुसरीकडे आमदार गायकवाड समर्थकांकडून छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याचे सांगत पुस्तकाचे वाचन जर झाले आणि त्यातून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख निघाला, तर आम्ही शिवप्रेमींना आवरू शकणार नाही! असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे.


