dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाणा पोलिसांची नोटीस | Prashant Ambi

Prashant Ambi : शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली असून, कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Prashant Ambi

बुलढाणा: शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली असून, कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

नोटीस मध्ये काय म्हटले?

आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे निषेधार्थ शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करुन निषेध सभा आयोजीत असल्याबाबत माहीती प्राप्त आहे. सदर आदोलनामध्ये आपण सुध्दा उपस्थित राहणार असल्याचे समजलेले आहे. त्याअर्थी आपणास यादवारे कळविण्यात येते की, सध्याची परीस्थीती पाहता वरील कार्यक्रमा दरम्यान आपण व आपले सहकार्यांनी भडकाउ भाषण करु नये की ज्यामुळे इतरांची भावना दुखावणार नाही, कोणविषयी अपमास्पद व एकेरी उच्चार करु नये, किंवा व्यक्तीगत टिका, जात, पंथ, धर्म, यावर सुध्दा टिका होणार नाही याची दक्षता घ्यावी. बुलढाणा जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37 (1) (3) मपोका लागु करण्यात आलेली असून त्याव्दारे जमाव एकत्र जमवीणे व इतर बरेच निबंध लागु करण्यात आलेले आहेत. वरिल बाबी पाहता आपण व आपल्या सहका-यांनी असे कोणतेही कृत्य, वक्तव्य, हालचाली करु नये की ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा वर दिलेल्या सुचनांचे उल्लंघन होईल. आपण व आपल्या सहका-यानी वरील प्रमाणे कृत्य केल्यास आपणाविरुध्द व आपल्या सहका-यां विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी, असे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top