dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाशिम जिल्ह्यात अवैध दारूविरोधात धडक कारवाई; ६ गुन्हे दाखल, १ अटक

वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरू असून, त्याच अनुषंगाने २३ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत वाशिम तालुक्यातील मोहगव्हाण व सुरकुंडी (शेतशिवार परिसर) येथे एकत्रितपणे छापे टाकून अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे समूळ उच्चाटन करण्यात आले. या कारवाईत ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ आरोपीस अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान सुमारे ६० लिटर गावठी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे ४,८७५ लिटर मोहासडवा (रसायन) तसेच हातभट्टीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ₹१ लाख ९१ हजार ९०० इतकी आहे.  निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईत डॉ. पराग नवलकर, विभागीय उप आयुक्त (अमरावती विभाग), अनंतकुमार खांदवे, प्रभारी निरीक्षक, एम. के. उईके, निरीक्षक (भरारी पथक) यांच्यासह दुय्यम निरीक्षक राजरतन मनवर, एम. एस. जाधव, अश्विनी उबाळे, सुरेश दि. चव्हाण तसेच जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कारवाई यशस्वी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top