लखमापुरी येथे शॉर्टसर्किटने १० एकर ऊस जळून खाक !

अंबड : तालुक्यातील लखमापुरी येथे मंगळवारी अचानकपणे महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकूण 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

अंबड : तालुक्यातील लखमापुरी येथे मंगळवारी अचानकपणे महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकूण 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

अंबड तालुक्यातील लखमापुरी येथील शेतकरी नंदलाल आसाराम चित्राल, शंकर आसाराम चित्राल व गोपाल चंद्रकांत चित्राल यांनी गट नं. ४३ मधील शेतात ऊस पिकाची लागवड केलेली होती. सध्या हा ऊस तोडणीसाठी आलेला असतांना मंगळवार, 23 डिसेंबर रोजी १० एकरांमध्ये असलेला ऊस महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काही क्षणात जळून खाक झाला आहे. महावितरण कंपनीची शेतातून गेलेल्या वीज वाहिणीची तारामध्ये अचानकपणे झालेल्या शॉर्ट सर्किटने काढणीस आलेल्या ऊसाला मोठ्या प्रमाणात आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी आसपासच्या शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र या आगीत १० एकर ऊस जळाल्याने सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊसाला आता तुरे आलेले आहे. वारा सुटल्याने तारांचे घर्षण होऊन या तुऱ्याचा वीज प्रवाह करणाऱ्या तारेला स्पर्श झाल्याने ठिणगी पडून थोड्या प्रमाणात आग लागून ऊस जळाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतात विजेच्या ताराकडे लाईनमन तसेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्यानेच अशा दुर्घटना होत आहेत. शेताचे बटाईदार कुलदीप कवडे आणि कैलास भापकर यांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पंचनामा करून नुकसानीच्या मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »