dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप बसवून अपघात रोखण्यावर भर

मेडशी : सावरखेडा टोल प्लाझा येथे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी विशेष जागरूकता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या सूचनांनुसार घेण्यात आली.

मेडशी : सावरखेडा टोल प्लाझा येथे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी विशेष जागरूकता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या सूचनांनुसार घेण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत सर्व वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टिव्ह टेप (परावर्तित चिकटपट्टी) बसविण्यात आली. कमी प्रकाशात, रात्रीच्या वेळी तसेच धुक्याच्या परिस्थितीत वाहनांची दृश्यमानता वाढविण्यासाठी ही टेप उपयुक्त ठरते. टोल प्लाझावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या वाहनांवर ही टेप बसवली तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनाही ती लावण्यात आली.  यावेळी वाहनचालकांना रिफ्लेक्टिव्ह टेपचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. रात्री व धुक्यात वाहन ओळखण्यास मदत होऊन अपघातांचा धोका कमी होतो, असेही चालकांना सांगण्यात आले. या जनजागृती उपक्रमात टोल प्लाझावरील कर्मचारी लोकेश, किरण, विश्वनाथ, महादेव, दानिश व धम्मपाल यांनी सक्रिय सहभाग घेतला.  टोल प्लाझाचे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र जयस्वाल यांनी सांगितले की, एनएचएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रस्ता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, भविष्यातही असे सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम नियमितपणे राबविले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top