छत्रपती संभाजीनगर : नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षपदी मनिषा भंन्साली यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शनिवार, 20 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नवरात्रोत्सवात 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षपदी मनिषा भंन्साली यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शनिवार, 20 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नवरात्रोत्सवात 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नवरात्र उत्सव महासंघाची बैठक संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीस सल्लागार प्रदीप दत्त, विजय साळवे, उद्योजक गजानन काटोले, ॲड. कल्याण खोले आदींची उपस्थिती होती. बैठकीत सर्वानुमते नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षपदी मनिषा भंन्साली यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी सचिन देशमुख, विजय सोमवंशी, स्वागताध्यक्षपदी फिरोज पटेल, महासचिवपदी विनोद माने, सचिवपदी किरण शर्मा, गीता आचार्य, स्मिता बोंबले, नितीन राठोड, दीक्षा पवार, सुमित पितळे, लता सरदार अर्चना धात्रक, जितेंद्र बोरा, महावीर भंन्साली, सुप्रिया चव्हाण, ॲड. निनाद खोचे, संदीप बारगळ, सुनिल उपाध्याय, उपाध्यक्षपदी ॲड. गोरख चव्हाण, संजय संचेती, समाधान पाटिल, संजय फतेलश्कर, मनोज गायके, सखाराम पोळ, मीरा चव्हाण, स्मिता साहूजी, राजलक्ष्मी गडेकर, ॲड. ईश्वर नरोडे, सुमित त्रिवेदी, ॲड. मीरा परदेशी, ॲड. नितेश तायडे, ॲड. अनिल वरठे, कोषाध्यक्षपदी पारस बागरेचा जैन, विजय पट्टेकर, बंटी पाटील, सरदार खान, इकबाल काजी, राजेंद्र पोहाल, निलेश धारकर, शेख हाफिज, नितीन पाटील, मार्गदर्शक – प्रदीप दत्त, विजय साळवे, नरेश पुरवार, जगदीश सिद्ध, विद्या पोळे, सल्लागार – राज्यपाल हरिभाऊ बागड़े, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भूमरे, माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आ. प्रदीप जैस्वाल, आ.अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, आ. प्रा.रमेश बोरनारे, आ. संजय केनेकर, आ. विलास भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आदींचा कार्यकारिणीत समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षा मनिषा भंन्साली म्हणाल्या की, महासंघाच्या कार्यकारिणीत सर्वपक्षीय व सर्वधर्मीय पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. महासंघाच्या वतीने गरबा दांडिया आयोजक मंडळासाठी या वर्षी 5 विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच ड्रोन कॅमेरा चालविण्याचे प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, महिला भजन मंडळ स्पर्धा, मोबाइल छोड़िए और खेल के मैदान से जुड़िए या घोषवाक्यानुसार विविध क्रीड़ा स्पर्धचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महासंघाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा नवरात्रीनंतर स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सार्वजनिक नवरात्र उत्सव आणि गरबा मंडळांनी मोंढा नाका येथील संपर्क कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
