सरपंचपदी शेख मोबीन कुरेशी पुन्हा विराजमान उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरपंचपद कायम

परभणी :  जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेख मोबीन अब्दुल करीम यांना सरपंच पद पुन्हा बहाल करण्यात आले. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. शेख मोबिन अब्दुल करीम कुरेशी यांची सप्टेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आल्याने सरपंचपदी निवड झाली. 

जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कुरेशी यांचे सरपंचपद आपत्र केले. या निर्णयाच्या विरोधात सरपंचांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने दोन वेळेस फेर सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. त्यानंतर कुरेशी यांचे सरपंचपद पुन्हा अपात्र करण्यात आले होते. त्यामुळे सरपंचांनी उच्च न्यायालयातील रिट याचिका दाखल करून या आदेशाला आव्हान दिले. याप्रकरणी १२ सप्टेंबरला सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण आर. पैठणकर यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश रद्द करत शेख मोबीन अब्दुल करीम यांना पुन्हा सरपंच पद बहाल केले. 

या आदेशात ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात संदर्भात सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व इतर अधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या बद्दल महत्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सरपंच शेख मोबीन अब्दुल करीम यांच्या वतीने विधिज्ज्ञ व्ही. डी. सपकाळ, अॅड. राहुल डी. खाडप यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानुसार सरपंच शेख मोबिन कुरेशी यांनी १७ सप्टेंबरपासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने शेख मोबीन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »