खामगाव : शहरापासून जवळच असलेल्या घाटपुरी जवळील सत्यनारायण मंदिरामध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती काम आटोपून दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिला. अपघातात दुचाकी सुमारे १०० फुटापर्यंत फरफटत गेली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी भागात २२ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या सुटाळा बु येथील रहिवाशी मुकुहसिंग सुपडासिंग बोराडे (72) हे घाटपुरी जवळील सत्यनारायण मंदिरामध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे त्यांचे काम आटोपून ते 22 मार्च रोजी दुपारी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच २८ एएल ४१६३ ने घराकडे निघाले असता एमआयडीसी भागातील विक्रमशी कंपनीजवळ पोहोचले असता रस्ता क्रॉस करताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागीच न थांबवता तब्बल 100 फुटापर्यंत दुचाकीसह बोराडे यांना फरपटत नेले. यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने त्यांना ट्रकच्या खालून बाहेर काढले व उपचारासाठी तात्काळ सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक जप्त केला असून वृत्त लिहेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.