शेगाव : जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून खंडणी मागीतल्याच्या एका शेतकरी महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या आधारे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शेगाव : जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून खंडणी मागीतल्याच्या एका शेतकरी महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या आधारे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती संपादित केली आहे. त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. मात्र हा मोबदला प्रति हेक्टर 40 लाख रुपये मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांकडून पाच लाख रुपये उकळल्याचा व आणखी जास्त पैशासाठी प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवस अगोदर फिर्यादी यांना जिगाव प्रकल्पात त्यांची पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळवून देतो. असे आश्वासन डिक्कर यांनी दिले. तसेच मोबदल्यात नगदी स्वरूपात पाच लाख रुपये घेतले. आरोपीने शासनाकडून प्रति एकराचे चाळीस लाख रुपये मिळवून देतो, परंतु मला आता प्रति एकरामागे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर मी तुमच्या विरोधात शासनाकडे आंदोलन करून तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही. अशी धमकी दिली. फिर्यादी व साक्षीदारांना खंडणी स्वरूपात प्रति एकराप्रमाणे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करून खंडणी दिली नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडून ठार मारून गायब करून टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून 21 मार्च रोजी शेगाव येथील जिगाव प्रकल्पा अंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डीक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून बाहेर काढल्याने थोड्या वेळाकरिता तणाव निर्माण झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शेगाव पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथील महिला शेतकरी पुष्पा संदीप मोरखडे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून त्यांच्या तोंडी तक्रारीवरून डिक्कर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के हे करीत आहेत.
शेतकरी नेते प्रशांत डेक्कर हे शेतकऱ्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकडण्याचा प्रकार करीत आहे. आम्ही सर्व एकत्र झालेले असून पोलिसात तक्रार नोंदविली. आमची एवढीच मागणी आहे की, डिक्करांनी आम्हाला मिळत असलेल्या आर्थिक मोबदल्यात ढवळाढवळ करू नये. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
– पुष्पा मोरखडे, हिंगणा कवठळ, तक्रारकर्त्या