ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत. या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ऐतिहासिक पुतळे उभारण्यात मोलाचे योगदान 

ऐतिहासिक पुतळे उभारण्यात राम सुतार यांचे मोलाचे योगदान मोलाचे आहे. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आले आहे. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत. त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असून, नव्या पिढीसाठी ते आदर्श आहेत.

राज्याच्या इतिहास, कला, समृद्ध सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »