माहोरा ( जालना) : जिल्ह्यात शेतीमाल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 10 लाख 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

माहोरा ( जालना) : जिल्ह्यात शेतीमाल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 10 लाख 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन, हरभरा, गहू, तूर, ज्वारी यासारखे धान्य चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली होती. जालना पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले.
पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने बुधवार, 19 मार्च रोजी संशयित चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी शेतीमाल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
बळवंतराव फुले ( रा. उमरडखेड, ता. भोकरदन ) गणेश बापूभाले ( रा. सावखेडा, ता. देऊळगावराजा ) आनंद मोरे ( रा. आडगव्हाण, ता. अंबड ) प्रकाश गिते ( रा. लोणगव्हाण, ता. अंबड ) या आरोपींनी कबुली दिल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.