dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पाळीव कुत्र्यांचा चिमुकलीला चावा; मालकासह पत्नीवर गुन्हा दाखल

जळगाव जामोद :  शहरात आठवडी बाजार परिसरात पाळीव कुत्र्यांनी १० वर्षीय चिमुकलीवर अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  कुत्र्यांना मोकाट सोडल्याप्रकरणी मालक सुरेश देविदास तायडे आणि त्यांच्या पत्नीवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      ४ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रंजना दिलीप तायडे यांची १०

वर्षीय मुलगी गौरी ही किराणा आणण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या दुकानावर जात होती. यावेळी रस्त्याने जात असतानाच, सुरेश तायडे यांच्या मालकीच्या दोन पाळीव कुत्र्यांनी अचानक

गौरीवर हल्ला केला. कुत्र्यांनी चिमुकलीच्या पाठीवर, मांडीवर, कमरेवर आणि छातीवर गंभीर चावा घेतल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. मुलीचा आरडाओरडा ऐकून तिचा भाऊ आदित्य याने धाव घेत मोठ्या शिताफीने तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर जखमी गौरीला उपचारासाठी तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या मुलीवर झालेला हल्ला पाहून रंजना तायडे यांनी सुरेश तायडे यांना जाब विचारला. मात्र, त्यांनी उलट फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत धमकावले. तसेच सुरेश तायडे यांच्या पत्नीनेही, ‘जर कुत्र्यांची तक्रार केली, तर मी उंदीर मारण्याचे औषध पिऊन तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेल,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रंजना दिलीप तायडे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top