LCB action in Jalna : सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या 14 लाख 64 हजार 273 रुपयांच्या ‘एमबी’ व बिलावर सही करण्यासाठी 45 हजारांची लाचखोरी करणार्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले. मुजाहेद वलिमिया शेख असे लाचखोर जलसंधारण अधिकार्याचे नाव आहे. ही कारवाई सोमवार, 17 मार्च रोजी सायंकाळी उशिरा जालना बसस्थानक परिसरात करण्यात आली.
जालना : सिमेंट बंधाऱ्याच्या कामाच्या 14 लाख 64 हजार 273 रुपयांच्या ‘एमबी’ व बिलावर सही करण्यासाठी 45 हजारांची लाचखोरी करणार्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले. मुजाहेद वलिमिया शेख असे लाचखोर जलसंधारण अधिकार्याचे नाव आहे. ही कारवाई सोमवार, 17 मार्च रोजी सायंकाळी उशिरा जालना बसस्थानक परिसरात करण्यात आली.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 अंतर्गत लेखाशीर्ष 2702- 6051 लघु पाटबंधारे योजनेमधून जालना जिल्हा परिषदेच्याकडून ग्रामपंचायत घोन्सी खु.( ता. घनसावंगी ) येथे सीमेंट नाला बंधारा मंजूर झाला होता. ग्रामपंचायत घोन्सी खु यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 रोजी ईनिविदा काढून 4 लाख 79 हजार 850 रुपयांचे टेंडर राजलक्ष्मी बिल्डिंग मटेरियल सप्लायर यांना दिले. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना घोन्सी खु. येथील सीमेंट नाला बंधाऱ्याला मटेरियल सप्लाय करण्याबाबत काम दिले. त्यानुसार तक्रारदार यांनी घोन्सी येथील सीमेंट बंधार्यास बांधकाम मटेरियलचा पुरवठा केला. त्यानंतर या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता राठोड यांनी 14 लाख 64 हजार 273 रुपयांची एमबी व बिल तयार करून तक्रारदार यांना दिले.
या एमबी व बिलावर सही करण्यासाठी अंबड उपविभागीय जलसंधारण अधिकारी मुजाहेद वलिमिया शेख याने सोमवार, 17 मार्च रोजी पंचासमक्ष तक्रारदार यांना 50 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर विभागाने सापळा लावला. दरम्यान, तडजोडी अंती 45 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे शेख याने मान्य केले. जालना बसस्थानक परिसरात एका हॉटेलसमोर शेख याला पंचासमक्ष 45 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर, सापळा अधिकारी शंकर मुटेकर यांच्या पथकाने केली.