नदीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह ३१ तासांनी सापडला 

मानोरा : तालुक्यातील सेवादासनगर येथील मृत्युंजय राजेश राठोड (वय २४) हा ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी अरूणावती नदीकाठावर गेला असता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. शोध-बचाव पथकाच्या  शोधमोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी युवकाचा मृतदेह सापडला.

मानोरा : तालुक्यातील सेवादासनगर येथील मृत्युंजय राजेश राठोड (वय २४) हा ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी अरूणावती नदीकाठावर गेला असता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. शोध-बचाव पथकाच्या  शोधमोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी युवकाचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलीस विभागासह पिंजर येथील शोध-बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, दिवसभर सुरू असलेल्या शोधानंतरही युवकाचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर तब्बल ३१ तासांनी   ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१२ वाजता दिग्रस तालुक्यातील मोरखेड पुलाजवळ त्याचा मृतदेह शोधमोहीम पथकाला सापडला. या घटनेमुळे सेवादासनगर गावात शोककळा पसरली असून राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या अपघाती मृत्यूने गावकऱ्यांना हादरवून सोडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »