dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वीज चोरट्यांना महावितरणचा ‘शॉक’; ७.८३ कोटींची आकारणी: अकोला परिमंडळात वीज चोरट्यांना महावितरणचा दणका 

वाशिम : अकोला परिमंडळात गेल्या आठ महिन्यात वीज चोरीविरोधात महावितरणकडून राबविण्यात आलेल्या व्यापक मोहिमेत १५२० वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणांतून एकूण ७ कोटी ८३ लाख रुपयांची आकारणी करण्यात आली असून ७ कोटी ७ लाख रुपये वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. वीज चोरी विरोधात मोहिम अधिक तीव्र करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहे. 

थेट वीज वाहिनीवर हुक टाकून वीज जोडण्या, मीटरमध्ये छेडछाड करून अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात व्यापक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून, वितरण व्यवस्थेतील नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भविष्यातही वीज चोरीविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एप्रिल २०२५ पासून म्हणजे गेल्या आठ महिन्यात उघड करण्यात आलेल्या वीज चोरीच्या प्रकरणामध्ये १५२० ग्राहकांनी थेट वीज चोरी किंवा मीटरशी छेडछाड केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत वीजबिलासह दंडात्मर कारवाईपोटी ७ कोटी ८३ लाख रूपये आकारण्यात आले असून १३२४ प्रकरणात ७ कोटी ७ लाख रूपयाची वसूली करण्यात आली असून वीजबिलासह तजजोड शुल्क न भरल्याने १० प्रकरणात वीज चोरीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

— 

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक वीज चोरी 

महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यापैकी सर्वात जास्त म्हणजे २ कोटी ९६ लाखाच्या ७५१ वीज चोऱ्या बुलढाणा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. त्यानंतर अकोला जिल्ह्यात २ कोटी ५८ लाख रूपयाची ४९९ वीज चोरीची प्रकरणे असून वाशिम जिल्ह्यात २७० प्रकरणात २ कोटी २९ लाख रूपयाची वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top