नवी दिल्ली : शांततेसाठी भारताच्या प्रत्येक प्रयत्नांना पाकिस्तानने शत्रुत्व आणि विश्वासघाताने उत्तर दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले आणि आशा व्यक्त केली की ते शुद्धीवर येतील आणि शांतीचा मार्ग स्वीकारतील.

नवी दिल्ली : शांततेसाठी भारताच्या प्रत्येक प्रयत्नांना पाकिस्तानने शत्रुत्व आणि विश्वासघाताने उत्तर दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले आणि आशा व्यक्त केली की ते शुद्धीवर येतील आणि शांतीचा मार्ग स्वीकारतील.
लेक्स फ्रीडमन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी असेही म्हटले की भारतीय वैदिक संत आणि स्वामी विवेकानंदांनी जे काही शिकवले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देखील शिकवतो. ते म्हणाले, मी माझ्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला आमंत्रित केले होते, परंतु शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाला शत्रुत्व आणि विश्वासघात मिळाला. मोदी म्हणाले की, पाकिस्तानच्या लोकांनाही शांतता हवी आहे, असे त्यांना वाटते कारण तेही संघर्ष, अशांतता आणि सततच्या दहशतीत जगण्यास कंटाळले आहेत जिथे निष्पाप मुलेही मारली जातात आणि असंख्य जीव उद्ध्वस्त होतात. पंतप्रधान म्हणाले की द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न हा सद्भावनेचा संकेत होता.
…ही एक राजनैतिक चाल होती
मोदी म्हणाले, ही एक राजनैतिक चाल होती जी गेल्या काही दशकांमध्ये कधीच पाहिली गेली नव्हती. ज्यांनी एकेकाळी माझ्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांना हे कळाल्यावर आश्चर्य वाटले की मी सार्क देशांच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना आणि सरकारप्रमुखांना आमंत्रित केले होते आणि आपले तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आठवणींमध्ये त्या ऐतिहासिक कृतीला सुंदरपणे टिपले आहे. भारताचे परराष्ट्र धोरण किती स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनले आहे याचा हा पुरावा आहे, असे मोदी म्हणाले.
आएसएसने आयुष्याला दिशा दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना मुलाखत दिली आहे. तीन तास चाललेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी आपण आरएसएसशी जोडलो गेलो हे माझे सौभाग्य आहे, असे म्हटले आहे. मला माझ्या जीवनाचा उद्देश्य आणि निस्वार्थपणे सेवा करण्याची शिकवण आरएसएसकडून मिळाली असल्याचे आरएसएसमुळे जीवनाला दिशा मिळाली असल्याचे ते म्हणाले.