dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कैलाश खेर यांचा ऑन-डिमांड गायला नकार 

दिल्ली : गायक कैलाश खेर यांनी नुकतेच दिल्लीतील एका कार्यक्रमात ऑन-डिमांड गाणे गाण्याची विनंती नाकारली. ते म्हणाले की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायकांना जाता-येता दोन ओळी ऐकवण्याचा आग्रह करणे कलाकाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो.

दिल्ली : गायक कैलाश खेर यांनी नुकतेच दिल्लीतील एका कार्यक्रमात ऑन-डिमांड गाणे गाण्याची विनंती नाकारली. ते म्हणाले की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायकांना जाता-येता दोन ओळी ऐकवण्याचा आग्रह करणे कलाकाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो. गायकांच्या मते, कलाकारांना मनोरंजनाचे साधन किंवा ‘जोकर’ समजू नये. कैलाश खेर २५ एप्रिल रोजी दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये ‘सिक्स सिग्मा लीडरशिप समिट’च्या सातव्या आवृत्तीत सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान जेव्हा होस्टने त्यांना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही ओळी गाण्यास सांगितले, तेव्हा गायक अस्वस्थ झाले. 

त्यांनी माईकवरच नाराजी व्यक्त करत म्हटले, “हीच विचारसरणी मला बदलायची आहे. गायक किंवा संगीताला असे मानले जाऊ नये की ‘सर दोन ओळी गाऊन दाखवा, मूड बनवा’. हे खूप चुकीचे आहे, अशा विनंत्या करू नका.” आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी कैलाश खेर यांनी क्रिकेट आणि सैन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, तुम्ही कधी सचिन तेंडुलकरला म्हणाल का की जरा एक षटकार मारून दाखवा? किंवा एखाद्या आर्मी जवानाला म्हणाल का की आपली पोझिशन घेऊन एक शॉट चालवून दाखवा? कलाकार साधक असतात, त्यांना जोकर बनवू नका. ते आपल्या मनाचे मालक असतात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top