dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आयपीएल २०२६ मध्ये गुजरातचा चौथा विजय; चेन्नईचा आठ गडी राखून पराभव; गायकवाडचे अर्धशतक व्यर्थ 

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ३७ वा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स  यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला; या सामन्यात गुजरात टायटन्सने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ३७ वा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स  यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला; या सामन्यात गुजरात टायटन्सने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, चेन्नई सुपर किंग्सला आपल्या निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात एकूण १५८ धावा उभारता आल्या . या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची  सुरुवात फारशी चांगली झाली नाही, केवळ ३७ धावा धावफलकावर असतानाच त्यांनी ४ गडी गमावले होते. त्यानंतर, त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका टोकाकडून डावाची सूत्रे हाती घेतली आणि शेवटपर्यंत फलंदाजी करत ६० चेंडूंत ७४धावांची नाबाद खेळी साकारली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीचा विचार करता, कागिसो रबाडाने तीन गडी बाद केले, तर अर्शद खानने दोन बळी घेतले; मोहम्मद सिराज आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top