इस्रायलचा इराणवर हल्ला देशभरात आणीबाणीची घोषणा 

तेल अवीव :  इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला आहे. इराणवर केलेले हल्ले अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईचा भाग आहेत. शनिवारी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली आहे. 

इराणची राजधानी तेहरानच्या मध्यवर्ती भागात झालेल्या स्फोटातून धुराचे लोट उठताना दिसल्यानंतर संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ही घोषणा केली. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने स्फोटाची पुष्टी केली, परंतु अधिक तपशील दिले नाहीत. संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजले. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की “इस्रायल राज्याकडे क्षेपणास्त्रे डागण्याची शक्यता असल्याने जनतेला तयार करण्यासाठी हा एक सक्रिय इशारा होता.” याअंतर्गत इराणी सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर इराणी सर्वोच्च नेते खामेनेई यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यानंतर शहरांमध्ये धुराचे लोट दिसत आहेत. हा हल्ला इराण आणि अमेरिका यांच्यातील अणुबॉम्बबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान झाला आहे. अमेरिकेला वाटते की इराणने आपली अणुबॉम्ब मर्यादित करावीत. ट्रम्प यांनी बुधवारी संसदेत इराणवर आरोप केला होता की, इराण अमेरिकेपर्यंत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांचा विकास करत आहे. ट्रम्प यांनी अनेकदा इशारा दिला होता की, चर्चा अयशस्वी झाल्यास अमेरिका लष्करी कारवाई करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »