dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात; ३८ भाविक जखमी तिघांची प्रकृती गंभीर   

नांदुरा : नागपूर मुंबई महामार्गावरील अपघाताची मालिका थांबतात थांबत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच नांदुरा महामार्गावर मध्य प्रदेशच्या बसच्या अपघातात चौघांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा याच मार्गावर  देव दर्शनासाठी निघालेल्या आंध्रप्रदेशच्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना  वडनेर भोलजी जवळ १८ एप्रिल रोजी रात्री ३ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,

आंध्रप्रदेश येथून देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्रप्रदेशच्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स क्रमांक AP 07 TC 3655  हि जात असताना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजी जवळ उभा असलेला ट्रक क्रमांक MH 18 BG 6737 यास मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघात; 38 जण जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व 108 ॲम्बुलन्स तसेच ओम साई फाउंडेशन च्या सदस्यांनी जखमींना वाहनाद्वारे  मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top