Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मंगळवार, 3 डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांची भेट घेवून सादर केले.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मंगळवार, 3 डिसेंबर रोजी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांची भेट घेवून सादर केले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी गारखेडा परिसरातील भारतनगर येथील मतदान केंद्रावर भाजपचे पदाधिकारी जालिंदर शेंडगे हे बोगस मतदान करुन घेत असल्याची माहीती एमआयएमचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी खासदार इम्तियाज जलील यांना मिळाली होती. इम्तियाज जलील हे मतदान केंद्रावर गेले असता त्यावेळी भाजपचे पदाधिकारी जालिंदर शेंडगे व इम्तियाज जलील यांच्यात शाब्दीक चकमक झाली होती. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी मध्यस्थी करीत दोघांना बाजूला केले हेाते. दरम्यान, तब्बल 30 तासानंतर भाजपचे पदाधिकारी जालिंदर शेंडगे यांनी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची खोटी तक्रार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिली. त्या तक्रारीवरुन इम्तियाज जलील यांच्याविरुध्द ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना दिले. पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर डॉ. कुणाल खरात, विकास एडके, प्रभाकर पारवे, प्रांतोष वाघमारे, काकासाहेब काकडे, सुभाष वाघुले, मोनिका मोरे, अंकिता गजहंस, अमोल गायकवाड, सुमित जमधडे, संदीप खरात, मिलिंद खंडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.