Fire in furniture market : मुंबईतील फर्निचर मार्केटमध्ये आग

Fire in furniture market

Fire in furniture market: मुंबई उपनगरात गोरेगाव पूर्वेकडील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार फर्निचर मार्केटमधील ५ ते ६ गाळ्यांना ही आग लागली असून संपू्र्ण लाकडी सामान जळून खाक झालं आहे.

Fire in furniture market

मुंबई :  मुंबई उपनगरात गोरेगाव पूर्वेकडील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार फर्निचर मार्केटमधील ५ ते ६ गाळ्यांना ही आग लागली असून संपू्र्ण लाकडी सामान जळून खाक झालं आहे.

आगीत अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस देखील दाखल झाले आहेत. मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका फर्निचर मार्केटमध्ये शनिवारी सकाळी आग लागली. सकाळी ११.२० च्या सुमारास आग लागली आणि खडकपाडा बाजारपेठेतील पाच फर्निचर दुकानांमध्ये ती पसरली, असे अधिकाऱ्याने सांगितले. आगीचे वर्गीकरण तिसऱ्या स्तरावर म्हणजेच मोठी आग म्हणून करण्यात आले आहे. घटनास्थळी १० पाण्याचे टँकर, जंबो टँकर आणि इतर उपकरणे उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »