बुलढाणा : जिल्ह्याला मॉसाहेब जिजाऊंचा अमूल्य असा वारसा लाभला आहे. हे आम्हा बुलढाणा करांचे भाग्यच म्हणावे लागेल.

बुलढाणा : जिल्ह्याला मॉसाहेब जिजाऊंचा अमूल्य असा वारसा लाभला आहे. हे आम्हा बुलढाणा करांचे भाग्यच म्हणावे लागेल.
जिजाऊंच्या या भूमीत ‘ सहकार’ रुजला, फळला.. फुलला.. अन् महाराष्ट्राच्या समाजकारणात व राजकारणात बुलढाणा जिल्ह्याचे नाव अजरामर झाले. स्वर्गीय पंढरीनाथ पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे या महान विभूती सह अनेकांनी शिव शाहू फुले आंबेडकर त्यांचा वारसा पुढे नेत, बहुजनांच्या कल्याणासाठी शिक्षण संस्था तर, काढल्याच याशिवाय ग्रामीण भागातील सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी साखर कारखाने, जिनिंग प्रेसिंग, सूतगिरण्या काढल्या.. पतसंस्थांचा पाया रचला. सद्यस्थितीत विविध पतसंस्थांमधून जिल्ह्यातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी चळवळ उभे राहिली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या सहकार क्षेत्राची मातृ संस्था असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेलाही मोठी उभारी मिळाली आहे.
जिल्ह्यातील सहकार चळवळ नव्या दमाने पुन्हा रुजावी .. सहकारावर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास दृढ व्हावा या हेतूने दैनिक महाभुमि चे मुख्य संपादक सुरेश देवकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली “सहकार भूमि ” हे विशेष पेज प्रत्येक महिन्यात दोन वेळा प्रकाशित होत आहे. असा प्रयोग करणारे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक म्हणून दैनिक महाभुमि ची ओळख होत आहे.