dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ट्रॅक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात एकाचा मृत्यू; तिघे जखमी

खामगाव :  ट्रक व ट्रॅव्हल्सची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स मधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 8 जून च्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील शेलोडी शिवारात उड्डाणपूला नजीक घडली.

खामगाव :  ट्रक व ट्रॅव्हल्सची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स मधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 8 जून च्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील शेलोडी शिवारात उड्डाणपूला नजीक घडली.

           8 जून च्या मध्यरात्री 2.45 वाजताच्या सुमारास हंस ट्रॅव्हल्स लक्झरी क्र. एआर-11-ई-1500 चा चालक अशोक शशीराव केसकर याने आपल्या ताब्यातील लक्झरी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन उपरोक्त ठिकाणी समोरच्या ट्रक क्र. एपी-27-टीझेड-2466 ला उजव्या बाजुने धडक दिली. या अपघातात लक्झरीच्या कैबीन मधील प्रवाशी राधेश्याम रामलाल परमार (50) रा. मालगावडी जि. उज्जैन यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिपक शंकरलालजी चव्हाण रा. बड़नगर जि. उज्जैन, बुखामसिंग कच्छाव (60) रा. देवास व राजा पदम पवार (25) रा. सनावद जि. खंडवा हे तिघे जखमी झाले. जखमींना त्वरीत खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी श्यामलाल रघुनाथ परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी लक्झरी चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top