खामगाव : इतर शहरातून खामगावात आलेला लाखो रुपयांचा गुटखा शहर पोलिसांनी पकडला आहे. स्थानिक अब्दुल हमीद चौकात एका बोलेरो पिकअप मधून हा गुटखा आला होता. वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन गुटख्यासह सदर बोलेरो वाहन जप्त केले आहे. ही कारवाई 9 जून रोजी सकाळी करण्यात आली.

शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असून परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून शहरात गुटखा आणला जातो. दरम्यान 9 जून च्या सकाळी एका बोलेरो पिकअप वाहन मधून येथील अब्दुल हमीद चौकात मोठ्या प्रमाणावर गुटखा आल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक बोलेरो पिकअप क्र.एम.एच 28 बी. बी-2069 दिसली. पोलिसांना पाहून सदर वाहनाचा चालक पसार झाला. पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा दिसून आला. यावेळी पोलिसांनी सदर वाहन शिवाजी नगर पोलीस स्टेशनला आणून लावले असून त्यातून 62 पोते गुटखा जप्त केला आहे. याबाबत पोलीस विभागाच्यावतीने अन्न औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.