गुरुजीच नाही, आम्हाला शिकवणार कोण? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान: विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके, गणवेश केले परत

डोणगाव : ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गाला शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी चक्क आपली पाठ्यपुस्तके, गणवेश शाळेला परत केल्याचा प्रक्रार घडला. गुरुजीच नाही, आम्हाला शिकवणार कोण? असा उद्विग्न सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.

बेलगाव येथील शाळेत इयत्ता पहिले ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. मात्र, इथे केवळ पाच शिक्षक असल्याचे दुर्दैव! गंभीर बाब म्हणजे, इयत्ता सहावी व सातवीला शिक्षक नसल्याने पालकांमध्ये असंतोष उफाळला आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थ पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे रीतसर पत्रव्यवहार केला. अनेकदा निवेदन सादर केले. परंतु, शिक्षक मिळतच नसल्याने अखेर संतप्त झालेल्या पालकांनी ५ ऑगस्टपासून पाल्यांसह शाळेत धडक देत विद्यार्थ्यांनी आपली पाठ्यपुस्तके, गणवेश व इतर साहित्य शाळेकडे परत केले. अलीकडे राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अनेकविध उपक्रम हाती घेतले. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांना निर्देश देखील दिले. मात्र, यात विद्यार्थी संख्या वाढली पण शिक्षकांची कमतरता भासू नये, याचा विचार प्रशासनाला आला नाही. असे बोलले जात आहे.  पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळा बेलगांव येथे मागील सत्रात एक शिक्षक सेवानिवृत झाला आहे. एका शिक्षकाची पदोन्नतीने तर एकाची पदावनतीने बदली झाली. या शाळेतील शिक्षक कमी झालेले आहेत. त्यांच्या जागेवर इतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शिक्षणावर बहिष्कार टाकण्याकरीता पालक व विद्यार्थी मुख्याधापक यांच्याकडे शाळेकडुन मिळालेली पुस्तके व गणवेश परत करीत आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी करणार उपोषण  

सात दिवसांच्या आत शिक्षकांची नियुक्ती न केल्यास १४ ऑगस्ट रोजी पालक शाळेतच उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात शाळा व्यवस्थापन समितीही सामील होणार आहे. निवेदनावर दिनकर नागो मैद व विठ्ठल शेषराव वानखेडे, संतोष आश्रु पळसकर आदींची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »