dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रक्षाबंधनला प्रवासी बंधूंकडून एसटीला १३७ कोटींची ‘ओवाळणी’: चार दिवसांत १ कोटी ९३ लाख प्रवाशांचा प्रवास

वाशिम : रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी बंधू-भगिनींनी राज्य परिवहन महामंडळाला विक्रमी ‘ओवाळणी’ दिली आहे. ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांत एसटी महामंडळाला तब्बल १३७.३७ कोटी रुपये उत्पन्न झाले असून, १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला. त्यापैकी ८८ लाख प्रवासी महिला होत्या.   विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी, गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या सणाच्या कालावधी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवारी तब्बल ३९..९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८-११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे. 

 रक्षाबंधनचा विक्रमी  प्रवास

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन सण दरवर्षी एसटीसाठी विक्रमी उत्पन्नाचे ठरतात. या दिवशी भाऊ-बहिणींच्या भेटीगाठीसाठी राज्यभर प्रवासाचे प्रमाण वाढते. यंदाही प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हा आर्थिक विक्रम नोंदवला गेला आहे. सरनाईक यांनी प्रवासी बांधवांचे आभार मानताना, सणाच्या दिवशी घरच्या उत्सवाऐवजी कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आणि मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top