गॅसची गळती होऊन घराला आग; अडीच लाखांच्या रोकडसह धान्य भस्मसात 

धावडा : घरगुती गॅस सिलेंडरला गळती लागल्यामुळे घराला आग लागली. या आगीत घरातील अडीच लाखांची रोख रक्कम, शेतीतून काढून आणलेला 15 क्विंटल गहू, हरभरा यासह घरातील साहित्य जळून खाक झाले. वडोद तांगडा ( ता. भोकरदन ) तेथे रविवार, 6 एप्रिल रोजी मध्यरात्री ही घटना घडली. 

    वडोद तांगडा येथील शेतकरी शांताराम तांगडे हे रविवारी रात्री अण्वा येथील आजूबाई देवीच्या यात्रेला कुटुंबासह गेलेले होते. मध्यरात्री अचानक घरातील गॅस सिलेंडरला गळती लागून घराला आग लागली. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी घराचा दरवाजा तोडून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील सर्व संसारोपयगी साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान, शांताराम तांगडे यांनी घरातील ठेवलेले रोख अडीच लाख रुपये, नुकतेच काढणी करून घरातील साठवून ठेवलेला 15 क्विंटल गहू, हरभऱ्याच्या गोण्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, सोमवार, 7 एप्रिल रोजी पोलिस आणि तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेतकरी शांताराम तांगडे यांना शासनाने तत्काळ नुकसाभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »