वाशिम : शहरातील प्रसिद्ध पद्मतीर्थ तलावात शनिवारी (दि. 23) सकाळी एका हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. हिंगोली नाका परिसरात राहणारे राधेसिंह ठाकूर (वय ५६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून जीवन संपवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राधेसिंह ठाकूर हे वाशिममधील एक अनुभवी हॉटेल व्यावसायिक होते. काही महिन्यांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे मानसिकरित्या खचल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्रीपासून ठाकूर घरातून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काही ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर शनिवारी सकाळी पद्मतीर्थ तलावामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसून आल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ठाकूर यांच्या खिशात एक स्वहस्ताक्षरित चिट्ठी (सुसाईड नोट) सापडली असून, त्यामध्ये त्यांनी आपली आत्महत्या ही आजाराला कंटाळून करत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.