जालना : गेल्या आठवड्यापासून जालना जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, सोमवार, 22 रात्रभर जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. तर जालना शहरात मागील २४ तांसात तब्बल ११६ मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. तर काही भागात साधारण पावसाची नोंद झालेली आहे. भोकरदन तालुक्यातील उत्तरेकडील काही भागात अजूनही जोरदार पाऊस झाला नाही. दरम्यान, जालना शहरातील कुंडलिका नदीला मोठा पूर आला असून रात्री बसस्थानकाजवळ वाहणाऱ्या सीना नदीला मोठा पूर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील रेल्वे स्टेशनसह अनेक भागात अंडरग्राउंड दुकाने पाण्याखाली बुडाले आहेत. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून रस्त्यांवर गुडघ्या एवढे पाणी साचले आहे.
जालना तालुक्यातील हातवनसह अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे.
बदनापूर शहरात रेल्वे स्टेशन रोडवर पाणी साचले
बदनापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बदनापूर–चिखली रस्ता व नाल्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून रस्त्यांवर पाणी साचून राहते. अनेक ठिकाणी चिखल व पाणथळ परिस्थिती निर्माण झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.