बुलढाणा : एका खाजगी कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या आरोपींना तब्बल १६०० किलोमीटर पाठलाग करुन स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना राजस्थान राज्यातील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मो. जुनेद मोहम्मद इमरान (३० वर्ष), निहाल अहमद फिरोज अहमद(२६वर्ष) रा. अमरावती अशी खंडणीखोरांची नावे आहेत.

मूळचे गुजरातचे व कंपनीच्या कामानिमीत्त बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर येथे राहणारे जयदीप गिडा यांनी २२ सप्टेंबर रोजी प्रकरणाची तक्रार दिली. त्यानुसार, कंपनीत विक्रेते पदावर असलेले त्यांचे सहकारी जयेश आणि हिम्मत हे बेपत्ता झाले होते. यादरम्यानच, आरोपीने फोन करुन तक्रारदार यांना त्यांचे सहकारी आमच्या ताब्यात असल्याचे सांगत अपहरण झाल्याची माहिती दिली. याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यास त्यांना जीवे मारू, त्यांना सोडण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची मागणी आरोपींनी तक्रारदार जयदीप नककु यांच्याकडे केली होती. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
४८ तासांचा नॉनस्टॉप पाठलाग..
खंडणीखोर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक रवाना करण्यात आले. या पथकाने मलकापूर, अकोला, अमरावती, चांदूर रेल्वे, परतवाडा, भोपाळ, राज्यस्थान असा ४८ तासांचा नॉनस्टॉप पाठलाग करीत राजस्थान पोलिसांच्या मदतीने कोटा येथून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.